Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप खंड – १
मेनू

सप्रेम नमस्कार!

तळटीपFootnote हे महाराष्ट्रातील काही भाषाअभ्यासकांनी मिळून सुरू केलेले प्रकाशन आहे. आम्ही भाषाविज्ञान आणि भाषाअभ्यासाच्या परिघातील लेखन प्रकाशित करतो. तळटीप नावाने एक नियतकालिक आम्ही प्रकाशित करतो.

भाषाध्ययन, कोशकार्य, सैद्धांतिक व उपयोजित भाषाविज्ञानाच्या शाखा, भाषांतर, भाषा आणि समाज, भाषा आणि परिसंस्था, भाषा आणि इतिहास, भाषा आणि संस्कृती, भाषा आणि जीवन, भाषा आणि राजकारण, भाषा आणि विज्ञान, भाषा आणि साहित्य, भाषा आणि व्याकरण, भाषाविषयक पुस्तकांचे परीक्षण, भाषाविषयक परिसंवाद-चर्चासत्रे-व्याख्याने यांची माहिती प्रकाशित करतो. अशा सर्व प्रकारचे अभ्यासपूर्ण भाषाविषयक लेखन तसेच अशा प्रकाशित-अप्रकाशित लेखनाविषयी माहिती व लेखन प्रकाशित करण्यात तळटीप नियतकालिकाला रस आहे.

संपर्काचा पत्ता: taltipfootnote@gmail.com
चलभाष +91 91457 11238 (Wassup)

ताज्या अंकात

  • चिनी लिपित विदेशी विशेषनामे कशी लिहितात? ​ डॉ धनंजय वैद्य - चिनी लिपीत ध्वनी किंवा स्वनिमाकरिता चिन्हे नसतात तर अर्थवान रूपिमाकरिता चिन्हे असतात. रुपिमचिन्हांमुळे चिनी लिपी वापरणाऱ्या अनेक भाषांमध्ये आदानप्रदान होऊ शकते. चीनमधल्या वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना कुठलेही लिखित पाठ्य वाचताना एकच अर्थ समजतो. त्या पाठ्याचे त्या त्या भाषेतील ध्वनी मात्र वेगळे असू शकतात. चीनमधल्या विशेषनामांचे उच्चारही स्थानिक भाषेनुसार बदलतात. उदा. हॉंगकॉंग शहराच्या नावाचे लेखन देशभरात सारखेच असले तरी कॅन्टनी भाषेत त्याचा उच्चार हॉंङ्गॉङ असा होतो तर मंत्री भाषेत स्यियाङ् गाङ्… पुढे वाचा
  • हिन्दी मराठी वाद नाही, मुद्दा आहे! ​ डॉ. सुधीर देवरे - भाषा या संवादासाठी म्हणजेच विचारांच्या आदान-प्रदानासाठी असतात. म्हणून सर्व भाषांवर प्रेम करावं, कुठल्याही भाषेचा द्वेष करू नये अशी समन्वयाची भूमिका मराठी माणसाने नेहमीच घेतली आहे. परंतु हिंदी ही भाषा कानामागून येऊन मराठीलाच गिळंकृत करायला निघाली आहे, याची जाणीव महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या सरकारी निर्णयानंतर महाराष्ट्राला झाली. मराठीला अभिजात दर्जाचं गाजर दाखवत मागच्या दाराने हिंदीला राजरोस प्रवेश देण्याचाच हा प्रकार! या निर्णयाला जोरदार विरोध झाल्यानंतर हिंदीची सक्ती नसून तिसरी… पुढे वाचा

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme